DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त येथील बॉईज हायस्कूलतर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व स्वातंत्र्यवीरांची वेशभूषा केलेले विद्यार्थी रॅलीचे आकर्षण ठरले. छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद, राजगुरू, नेताजी सुभाष चंद्र बोस, इंदिरा गांधी, द्रौपदी मुरमु यांच्या वेष प्रदान केलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. बँड पथकाच्या तालावर मार्गक्रमण करीत रॅली मुख्य रस्त्याने धर्मापुर, मानीपुरा, कलारओळी चौक मार्गे पोलीस स्टेशन येथे नेण्यात आली. याठिकाणी थानेदार व पोलीस कर्मचाऱ्यांनी रॅलीचे स्वागत करून विद्यार्थ्यांना बिस्कीटचे वाटप केले. रॅलीची सांगता बॉईज हायस्कूल येथे करण्यात आली. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.