DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी- निवास गागडे
कोल्हापूर:- इचलकरंजी येथील वर्धमान हौसिंग सोसायटीच्या आतील बाजूस असलेल्या श्री १००८ भगवान महावीर वीसपंथी दिगंबर जैन मंदिराचे अज्ञाताकडुन कुलूप तोडून मंदिराच्या आतील कपाटातील लॉकरमध्ये मंदिरासाठी दान केलेल्या चांदीच्या वस्तू अर्थात चांदीचे एक नग अभिषेक पात्र एक किलो वजनाचे, चौरीचे दांडे चार नग अंदाजे एक किलो वजनाचे , पालखीचे दांडे तीन नग अंदाजे २५०ग्रॅम वजनाचे, चांदीचे सिंहासन तीन नग अंदाजे ५००ग्रॅम वजनाचे, चांदीचा अभिषेक कलश चार नग अंदाजे ४०० ग्रॅम वजनाचे , चांदीचा पाळणा एक अंदाजे एक किलो वजनाचे., शांतीधारा कलश एक अंदाजे ५०० ग्रॅम वजनाचे, पंचमेरू पाच नग अंदाजे ५०० ग्रॅम वजनाचे, चांदीचे छोटे अभिषेक कलश चार नग ४०० ग्रॅम वजनाचे , चांदीचे पांडुक शिला एक अंदाजे एक किलो वजनाचे , चांदीचा नारळ एक नग अंदाजे ५०० ग्रॅम वजनाचे , व दानपेटीतील वेगवेगळ्या दराच्या चलनी नोटा व नाणी असे अंदाजे ३००० रू. अशा प्रकारे ८ किलो ५० ग्रॅम वजनाचे चांदीची मूल्य रक्कम ४९३५०० रू. व ३०००रू. रोख रक्कम अशी एकूण ४,९६,५०० रू . चोरी झाल्याची फिर्यादी अजितकुमार बाबसो खंजिरे रा. वर्धमान हौसिंग सोसायटी यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाणेस दिली. इचलकरंजी पोलिसांनी अज्ञात चोरा विरूद्ध गु.र.न. ३७६/२०२४ बी. एन.एस. ३०५ (a )प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास इचलकरंजी पोलिस ठाणेचे सपोनि विजय गोडसे करीत आहेत.