DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – सुनिल मैदीले
नागपूर:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते
प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण विदर्भात आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा काढण्यात आली.
जयभीमचे जनक बाबु हरदास एल,एम,एन यांचे नातू प्रशांतजी नगरकर यांच्या नेतृत्वामध्ये उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड भिवापूर आणि कुही या तिन्ही तालुक्यात आरक्षण बचाव जनसंवाद यात्र काढण्यात आली होती.उमरेड विधानसभेत सामाजिक कार्यकर्त्या इंजि सपना राजेंद्र मेश्राम व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उर्फ राजुभाऊ यांनी या यात्रेचे आयोजन केले होते.उमरेड क्षेत्रातील आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.विधानसभेतील उमरेड,भिवापूर आणि कुही या तिन्ही तालुक्यातील आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या यात्रेची सुरुवात उमरेड तालुक्यातील पाचगाव येथील बौद्ध विहारातून या यात्रेला सुरुवात करण्यात आली.
अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण व क्रिमिलेअर न लावण्या संदर्भात संसदेत कायदा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्वरित रद्द करावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अनुसूचित जातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेले परंतु जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेले १,२५,००० पदे रिक्त झाले असून ते तात्काळ भरण्यात यावे, महिला सुरक्षा, शिक्षण व्यवस्था आणि रोजगार निर्मिती व जुनी पेन्शन योजना यावर सरकारने लवकरात लवकर खुलासा करावा. या विषयाला अनुसरून ही आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती.
आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेचा शेवट कुही शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मेश्राम, राजु गायकवाड, जोगेंद्र मेश्राम, मिलिंद लोखंडे, सुरज खेडकर, किशोर घरत, चंद्रमणी शेंडे, मंगेश शेंडे, विश्वनाथ डेकाटे, संदेश मेश्राम, जितेंद्र सवाईकर, संदीप गोळघाटे, रजत लिंगायत, मुकेश बहादुरे, अशोक वंजारी, रमेश घुटके, रमेश ऊके, हिमांशू बहादुरे, अशोक रामटेके, सोनु कुर्वे, उत्तम मेश्राम, सुरेश पाटील, अशोक रामटेके, सिलवान गजभिये, सुधाकर बडगे, इज्जु शेख, अल्ताफ अवसरे, दिपक ऊके, सरीता गौतम कांबळे, कुंदा घरत, लक्ष्मी पिल्लेवान, प्रतिभा पाटील, दुर्गा हाडके, अर्चना बहादुरे, छाया पिल्लेवान,चंद्रकला सुखदेवे, निर्मला सातपुते, संगीता सुखदेवे, संगीता शंभरकर, लता शंभरकर, सीमाताई हाडके नागपूर जिल्हा तसेच उमरेड विधानसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.