DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी सरिता नंदरधने तर उपाध्यक्षपदी मेघा सावसाकडे यांची निवड करण्यात आली.
रविवारी (दि. 13) स्थानिक विश्राम गृहात कायकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत सरिता नंदरधने आणी मेघा सावसाकडे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. यावेळी उमरेड विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष पुंढलिक राऊत, जिल्हा उपाध्यक्ष विलास मामूलकर, मीडिया सेलचे माजी जिल्हाध्यक्ष अमर मोकाशी, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष गजानन महाकाळकर, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवी बाभरे, उमरेड शहर अध्यक्ष कैलाश वरेकर, बाळू नसकरे, भिवापूर शहर अध्यक्ष सुनील मैदिले आदींसह महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.