DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- अकिल शहा
साक्री: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित अनु.जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा भाडणे ता.साक्री जि.धुळे येथील उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षिका मालती काशिनाथ सोनवणे(फुलपगार) यांच्याकडुन निर्मित शैक्षणिक अध्यापनाच्या व्हीडीओस जिल्हापातळीवर यश संपादन केले.
सदर व्हीडीओ निर्मीती स्पर्धेचे शिक्षकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फंत सहा गटांमध्ये आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी सतत नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणार्या मालती सोनवणे या शिक्षिकेकडुन पाच व्हिडिओंसह सहभाग नोंदविण्यात आलेला होता .या स्पर्धेत श्रीमती सोनवणे यांच्याकडुन निर्मित व्हिडीओने अध्यापनाच्या दृष्टीने गुणवत्तादायी ठरत जिल्हापातळीवर प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाची यशस्वी मोहर उमटवित यश मिळविले. यात गट सहावी ते आठवी विषय भाषा या व्हिडिओला जिल्हास्तरीय प्रथम व सामाजिक शास्त्र या विषयात द्वितीय क्रमांकाचे यश मिळाले. तसेच तालुकास्तरीय देखील प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे.याकरीता समाजकल्याण सहा.आयुक्त सुंदरसिंग वसावे, शानिशा अधिकारी सैंदाणे, निवासी शाळेचे मुख्याध्यापक चेतन हिरे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंदांकडुन अभिनंदन करण्यात आले.