DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अमर मोकाशी
आलिशान घर, महागडी कार, नवीन कोऱ्या दुचाक्या
वाळू तस्करांशी संबंध; जमवली कोटींची माया
भिवापूर :- साध्या चारचाकी वाहनाचा ड्रायव्हर असलेल्या एकाने कमी वेळात प्रचंड प्रगती केली व कोटींची माया जमवली. बेईमानीच्या धंद्यामधून जमा झालेल्या या पैशाने त्याने जेसीबी टिप्पर सारखी वाहने खरेदी केलीत. गैरमार्गाने जमविलेल्या संपत्तीची इतरांना हवा लागू नये याची खबरदारी म्हणून त्याने जेसीबी, टिप्पर स्वतः ऐवजी आपल्या मित्रांच्या नावाने खरेदी केलेत.
ही गोष्ट इतरांपासून लपवून ठेवण्याचे त्याने खुप प्रयत्न केलेत. मात्र सुरुवातीला काही निवडक लोकांना व नंतर हळू हळू ती अनेकांना कळली. त्याने जमवलेली माया आणी दुसऱ्याच्या नावावर केलेल्या टिप्पर व जेसीबी खरेदीच्या खमंग चर्चा सध्या ठिकठिकाणी ऐकायला मिळतात. अल्पावधीतच त्याने स्वतःचा एवढा विकास कसा काय घडवून आणला याविषयी खोलात जाऊन माहिती घेतली असता त्याच्या करोडपती बनण्याचे गुपित वाळूच्या चोरट्या वाहतूकित असल्याचे समोर आले.
भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यामधून भिवापूर मार्गे मोठ्या प्रमाणात चोरीची वाळू नागपूर, उमरेड, बुटेबोरी, वर्धा, हिंगणघाट, अमरावती येथे वाहून नेली जाते. मागिल अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरु आहे. या गोरखधंद्यातील लोकांशी त्या ड्रायव्हरचे तार जुळले आहे. एन्ट्री वसुली बंद असली की चोरीची वाळू भरलेले ट्रक, टिप्पर अधिकाऱ्यांची नजर चुकवून सुखरूप पास करुन देण्याचे तो काम करतो. याशिवाय एन्ट्री सुरु असली की मोटार मालकांकडून एन्ट्री वसुल करुन ती अधिकाऱ्यांना पोहचविण्याचेही काम त्याच्याकडेच असते. या बदल्यात त्याला मोटार मालक व अधिकारी या दोघांकडून चांगली दलाली मिळते. यातून त्याने अल्पवाधित कोटींची माया जमविली व या हरामाच्या पैशाची गुंतवणूक त्याने टिप्पर जेसीबीत केली. चौकशी झाल्यास आपण कचाट्यात सापडू नये यासाठी सावधगिरी म्हणून त्याने ही वाहने वाळू तस्करीतील त्याच्या मित्रांच्या नावावर खरेदी केलीत.
—–> आलिशान घर, महागडी कार, नवीन कोऱ्या दुचाक्या जेसीबी, टिप्पर सोबतच राहण्यासाठी त्याने आलिशान घर बांधले. हे घर व घरासमोर उभी असलेली महागडी कार आणी नवीन कोऱ्या दुचाक्या बघून एखाद्या गर्भ श्रीमंताचे हे घर असावे असा बघणाऱ्याचा समज होतो. परंतु त्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत कळल्यानंतर मात्र समोरच्याचे डोळे विस्फारले जाऊन तो तोंडावर हात ठेवल्यावाचून रहात नाही. साध्या चार चाकी ड्रायव्हरचा हा थाटबाट पाहून तो नक्कीच हरामाच्या कमाईवर चटावला असल्याचा समोरच्याला पक्का विश्वास होतो. वाळू तस्करांचा हस्तक, खबऱ्या तर कधी दलाल म्हणून काम करणाऱ्या या ड्रायव्हरने प्रचंड माया गोळा केली. त्याचा थाटबाट बघून एखाद्याने यामागचे रहस्य त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास या विषयावर तो तोंड उघडत नाही व " मुक्या " चे सोंग घेतो. " शासनाच्या महसूलाचे " कोट्यावधीचे नुकसान कारणाऱ्या वाळू तस्करांची वाळू भरलेली वाहने पास करून त्याबदल्यात महिन्याला लाखोचा मलिदा चाखणाऱ्या या संधीसाधू ड्रायव्हरच्या चल अचल संपत्तीची संबंधित यंत्रणेकडून चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.