अट्टल गुन्हेराचा उदात्तीकरण करणाऱ्याना उंब्रज पोलिसांचा 8 जणांना खाकी हिस्का…
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी :- बापूसाहेब कांबळे
सातारा :- प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या गुन्हेगाराचा फोटो झळकावत रॅली काढून त्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना उंब्रज पोलिसांनी चांगलाच हिस्का दाखवला.
रॅली काढून त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करत दहशत माजवीण्याचा प्रयत्न केल्याप्ररणी आठ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील बुलेट, युनिकॉर्न सहित तीन गाड्या हस्तगत करण्यात आल्या. यापुढे गुन्हेगारीचा उदात्तीकरण करताना आढल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा कडक इशारा सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी दिला.
1) अजय प्रकाश चव्हाण वय 21 वर्षे
2) विनायक प्रविण निकम वय 20 वर्षे
3) प्रणव काशिनाथ चव्हाण,
4) तेजस राजेंद्र सुतार दोघांचे वय 21 वर्षे
5 )शुभम संभाजी कदम वय वर्षे 20 6)योगेश पांडुरंग थोरात वय वर्षे 20, 7 ) अक्षय प्रकाश चव्हाण वय वर्षे 28,
8 ) विजय पोपट निकम वय वर्षे 28 सर्व राहणार इंदोली ता. कराड अशी कारवाई झालेल्यांची नांवे आहेत.