नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

घरफोडी व जबरी चोरीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश..!


DPT NEWS NETWORK 🗞️✍️🗞️ प्रतिनिधी:- प्रविण चव्हाण

नंदुरबार -: दि.30 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा पोलीस दलातर्फे कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात सतर्कपणे कर्तव्य करीत असतांना पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील  मच्छी बाजार परिसरात एक इसम हा त्याचे ताब्यात महागडे मोबाईल विक्री करण्याचे उददेशाने फिरत आहे, अशी खात्रीशिर माहिती मिळालेवरुन पोलीस अधीक्षक  श्रवण दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथकास खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळालेले बातमीनुसार नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परिसरात जाऊन संशयित इसमाचा शोध घेतला असता एक इसम ईलाही चौककडे जाणा-या रस्त्यावर एका घराजवळ संशयितरित्या उभा असलेला दिसुन आला, त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव. साहिल ऊर्फ भु-या सलीम बेग मिर्झा, (24) रा. पटेलवाडी, नंदुरबार असे सांगितले.
  त्यास त्याचे ताब्यातील मोबाईल बाबत विचारपुस करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास स्था.गु.शाचे पथकाने विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सदरचे मोबाईल हे त्याचे साथीदार

रजा अब्दुल पिंजारी, रा. पटेलवाडी, नंदुरबार.

रेहमान शरिफ मिस्तरी, रा. चिराग गल्ली, नंदुरबार.

यांचे मदतीने सुमारे 5 ते 6 महिन्यांपुर्वी नंदुरबार शहरातील मंगळ बाजार परिसरात असलेल्या एका मोबाईल दुकानाचे शटर तोडून चोरी केले होते बाबत सविस्तर माहिती दिली.
     त्याचवेळी स्थागुशा पथकाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 423/2024 भा.न्या. संहिताचे कलम 305 (अ), 331(3), 331(4) प्रमाणे सदर बाबत गुन्हा दाखल असल्याची खात्री केली, सदर ताब्यातील इसमाचे साथीदार यांचा शोध घेतला असता ते मिळुन आले नाहीत. तरी इसम नामे साहिल ऊर्फ भु-या सलीम बेग मिर्झा याचेकडुन एकुण 20,250/- रुपये किमतीचे 2 मोबाईल हस्तगत करण्यात आले असुन त्याला शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
    तसेच उपनगर पोलीस ठाणे येथे दि. 30 ऑक्टोबर 2024 रोजी भा. न्या. संहिताचे कलम 304(2), 3(5) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु असतांना  पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, नंदुरबार शहरातील वेलनेस मेडीकलचे परिसरात एक इसम महागडे मोबाईल कमी किमतीत विक्री करीत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळालेवरुन पोलीस अधीक्षक  श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथकास खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले.
    स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मिळालेले बातमीनुसार नंदुरबार शहरातील वेलनेस मेडीकल जवळ आले तेथे एका बोळीत त्यांना एक संशयित इसम दिसुन आला त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव आकाश प्रकाश पवार, (24) रा. पातोंडा, ता. जि. नंदुरबार असे सांगितले.
      त्यास त्याचे ताब्यातील मोबाईल बाबत विचारपुस करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास स्था.गु.शा. पथकाने विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस करता त्याने त्याचा साथीदार सागर (पूर्ण नाव माहित नाही) रा.धुरखेडा ता. शहादा याचे मदतीने तीन ते चार महिन्यांपुवों दुचाकी वाहनावर नंदुरबार शहरातील एकता नगरजवळ दुपारचेवेळी एका महिलेच्या हातातून जबरीने मोबाईल हिसकावून चोरी केले असले बाबत सविस्तर माहिती दिली.
   त्याच वेळी स्था.गु.शा. पथकाने उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता सदर बाबत उपनगर पोलीस ठाणे येथे वर नमुद प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री केली.
    तसेच सदर ताब्यात असलेल्या इसमाकडील दुस-या मोबाईलबाबत विचारपूस करता सदरचा मोबाईल हा त्याने त्याचा साथीदार स्वप्नील दिलवर वळवी, रा. असालीपाडा, ता. नवापूर जि नंदुरबार याचे मदतीने दुचाकीवरुन नंदुरबार शहरातील सी बी गार्डन ते तुलसी हॉस्पीटल दरम्यान पायी चालत असलेल्या एका इसमाचे हातातून मोबाईल हिसकावून पळ काढला होता बाबत सविस्तर माहिती दिली. तरी इसम नामे आकाश प्रकाश पवार (भिल) याचेकडुन एकुण 50,000/- रुपये किमतीचे 3 मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्याला उपनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
     सदर कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक  श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक  आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील, पोउपनि  मुकेश पवार, राकेश मोरे, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, विकास कापूरे, अभय राजपूत, विजय ढिवरे, आनंदा मराठे आदीनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:36 am, January 13, 2025
temperature icon 18°C
साफ आकाश
Humidity 57 %
Wind 5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!