DPT NEWS NETWORK 🗞️✍️🗞️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
नागपुर:- पंडित नेहरू हायस्कूल व माऊन्ट एव्हरेस्ट उच्च प्राथ शाळा, मकरधोकडा, काटोल रोड, नागपूर येथे दि. २७/१२/२०२४ ला स्व हरिरामजी बेहरे स्मृती क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडा महोत्सव ला स्व. संस्कृती सचिन मिश्रा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री सचिन मिश्रा व भारती मिश्रा यांच्या सहकार्याने संपन्न झाली. या क्रिडा महोत्सवात कबड्डी, खो-खो लांब उडी, धावनी व लंगडी या सारखे खेळ खेळवले गेले यात ९०० विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले होते. आज दिनांक ०१/०१/२०२५ ला या क्रिडा महोत्सवाची सांगता संस्थेचे सचिव श्रीराम बेहरे यांच्या अध्यक्षतेखाली, सचिन मिश्रा, मुख्याध्यापक प्रकाश भोयर, मुख्याध्यापिका सौ वंदना घारपुरे,पर्यवेक्षक राजेश भागवतकर, सकाळ विभागाचे पर्यवेक्षक बाळा आगलावे व भारती मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून क्रीडा महोत्सवाची सांगता करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम बेहरे यांनी विद्यार्थ्यांना नविन वर्षा च्या शुभेच्छा देवुन खेळाचे महत्त्व समजावून सांगितले व विद्यार्थ्यांना आव्हान केले की नियमितपणे व्यायाम करावा जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील. या क्रिडा महोत्सव क्रार्यक्रमाचे संचालन उदय देशमुख तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश मधुकर भोयर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक दिलीप आडे, राहुल शेंद्रे, उल्हास पुरकाम, राजेश त्रिपाठी, विजय घाटुर्ले, अनिल राऊत, राजेश शिंदे, नितीन तवले, राजकुमार कासलिकर, आश्विन ढगे, सौ संध्या दुधाट, आशा अबांदे, मिना डफरे, चंदा ढगे, मनिषा तिडके, तारिका बालवानी, संगीता रेवतकर, सारिका ढोमणे, लता लाखे, निर्मला मोडक, कदम मँडम, खडगी मँडम, गजभिये मँडम, मोहनकर मँडम, धुर्वे मँडम, निता बेहरे, अरुण केळवदे, पाटील बाई व अजय ढोमणे आदींनी परिश्रम घेतले.