DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- संजय दिंडे
कोल्हापूर:- शिव भोजन ऍपद्वारे काढलेले फोटो कपात केले म्हणून वाशिम तहसील कार्यालयातील पुरवठा अधिका-याला शिवीगाळ व एकावर चाकु हल्ला करण्यात आलेने त्याच्या निषेधार्थ हल्लेखोरांचेवर कारवाई व्हावी याकरिता अधिकारी,कर्मचारी यांनी कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शिवभोजन अॅप व्दारे काढण्यात आलेले फोटो का कपात केले म्हणुन वाशिम तहसिल कार्यालयातील पुरवठा निरिक्षण अधिकारी मनोज लटारे यांच्यासोबत वाद घालुन व शिवीगाळ करून एकावर चाकु हल्ला केल्याची घटना वाशिम तहसिल कार्यालय परिसरातील पुरवठा विभागात 9 जानेवारी रोजी घटना घडली. या घटनेत एकावर चाकुहल्ला करण्यात आला असुन दुसऱ्या युवकास दगडाने मारुन गंभीर जखमी करण्यात आले. तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षक मनोज लटारे काम करीत असतांना त्यांच्या कार्यालयात यशोधरा महिला बचत गटाच्या अध्यक्षा यांचे पती अब्दुल अकील तेथे आले व त्यांनी 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत शिवभोजन अॅप व्दारे काढण्यात आलेले फोटो का कपात केले असे म्हणुन वाद घातला व शिवीगाळ केली. पुरवठा निरिक्षण अधिकारी मनोज लटारे यांच्या कॅबीनच्या दरवाजावर लाथा मारून लटारे यांना अश्लिल शिवीगाळ करीत जिवेमारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अब्दुल अकील व त्याचा मुलगा अब्दुल अकीब तसेच अज्ञात 4 ते 5 जनांविरुध्द भारतीय न्याय संहीता कलम 132,118(1), 296, 189(2), 191 (2), 191 (3),190,351(2),351(3), 352, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घडलेली घटना ही निंदनीय असून शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे मनोबल खच्चीकरण करणारी आहे संघटनेतर्फे सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असून संबंधित व्यक्तीचे शिव भोजन केंद्र तात्काळ रद्द करण्यात यावे तसेच सर्व संबंधितांना लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा कर्मचारी व अधिकारी यांचेमार्फ़त काम बंद आंदोलन करणेत येईल असा इशाराही अधिकारी यांनी शासनास निवेदनाद्वारे दिला आहे.