पत्रकारिता एक आव्हान म्हणून स्वीकारा : शैलेंद्रजी साळे.
तिळगुळ वाटपासह मागील वर्षाचा आढावा व नवीन वर्षाचा संकल्प करण्यात आला.
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- विजय सनदी
कोल्हापूर:- कोल्हापूर बावडा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित जन ग्रामीण पत्रकार संघाच्या कोल्हापूर व सांगली विभागातील पत्रकार बांधवांची आढावा बैठक राज्याचे मुख्य पदाधिकारी यांच्या समवेत सोमवार दि 13 जानेवारी रोजी संपन्न झाली.
या आढावा बैठकीत पत्रकारिते पुढील आव्हाने, लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची कर्तव्य, त्यांची पालन करावयाची आचारसंहिता, गोर गरीब, सर्वसामान्य, तळागाळातील लोकांना आपल्या लेखणीतून न्याय मिळवून देण्याची तळमळ पत्रकारांत दिसली पाहिजे असे प्रतिपादन व मार्गदर्शन जन ग्रामीण पत्रकार संघांचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र साळे यांनी केले. प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे यांनी पत्रकारिता करीत असताना येणाऱ्या विविध अडचणींबाबत, मुलाखत तंत्र, संवाद शास्त्र, बातमी लेखन याबाबत वैशिष्ठ पूर्ण माहिती दिली.
राज्य कार्याध्यक्ष युवराज देवरे यांनी पत्रकार बांधवांनी संघटित होऊन स्वतःच्या हक्काच्या लढाईसाठी आपल्याला लढायचं आहे. त्याचप्रमाणे पत्रकार बांधवांवर विविध ठिकाणी होणारे अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी पत्रकार संघ कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केले.
बैठकीत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय सनदी यांनी पत्रकार संघाचा मागील वर्षाचा आढावा घेऊन बैठकीची सुरुवात केली. कोल्हापूर कार्याध्यक्ष डॉ.प्रा. नागेंद्र जाधव प्रत्येक तालुक्यात जन ग्रामीण पत्रकार संघाची मजबूत बांधणी करायची व पत्रकार बांधवांना विविध प्रशिक्षणाद्वारे ज्ञानाने समृद्ध करण्याचा संकल्प या आढावा बैठकी मध्ये करण्यात आला. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातील कोल्हापूर जिल्ह्याची विविध विषयांवर चर्चासत्र निसर्ग रम्य वातावरणात चंदगड तालुक्यात ठेवण्यात आले आहे. त्यावेळेस वनभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी हातकणंगले तालुका दर्शन पोलीस टाईम प्रतिनिधीपदी जयप्रकाश दिनकर कांबळे यांची निवड जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री शैलेशजी साळे , दर्शन पोलीस टाईम संपादक युवराजजी देवरे व प्रदेशाध्यक्ष देवानंदजी अहिरे यांच्या हस्ते ओळखपत्र नियुक्तीपत्र देण्यात आले. नवीन वर्षाची दर्शन पोलीस टाईम या वृत्तपत्राची दिनदर्शिका वाटप करण्यात आली. बैठकीमध्ये मकरसंक्रांत निमित्ताने तिळगुळ वाटप करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर आढावा बैठकीला कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय सनदी,कार्याध्यक्ष प्रा. नागेंद्र जाधव, चंदगड तालुका प्रतिनिधी संदीप सकट, शिरोळ तालुका प्रतिनिधी सचिन कोळी, भुदरगड प्रतिनिधी सत्यजित शिंदे, करवीर तालुका प्रतिनिधी संजय दिंडे, इचलकरंजी शहर प्रतिनिधी नारायण कांबळे, इचलकरंजी शहर प्रतिनिधी निवास गांगडे, सांगली व मिरज प्रतिनिधी रमजान मुल्लानी, कोरोची प्रतिनिधी विकी माने, कोल्हापूर प्रतिनिधी अंकुश दिंडे व या बैठकीला विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.