DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- किरण अडागळे
सातारा:- याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन राजाराम पवार,वय २८, राहणार पाटखळ माथा, सातारा याची खाजगी बस असुन तो दररोज मुलामुलींना त्याच्या खाजगी शाळा बसने सोडत असतो. पिडीत मुलगी अल्पवयीन असुन त्याने मुलीबरोबर ओळख वाढवली व सतत संपर्क करूं लागला. यानंतर त्याने आकटोबर महिन्यात मित्र पुष्कर कांबळे यांच्या सदरबझार येथील घरी घेवुन आला व तेथे त्याने या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. तसेच संशयित यांनी मुलीसोबत फोटो काढले. यामुळे पिडीत अल्पवयीन मुलगी अधिकच घाबरली व तिने याबाबत माहिती ही दिली नाही. या सर्व घटनेनंतर पिडित मुलगी घरी अबोला धरून राहु लागली व घाबरून राहु लागली. त्यामुळे तिच्या आईला शंका आली व आईने मुलीला बोलते केले असता मुलीने घडलेल्या घटनेची माहिती दिली. मुलीवर अत्याचार झाल्याचे दिसून आल्याने कुटुंबियांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात जाऊन खबर दिली. सातारा शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के, पोलिस देशमुख, राहुल घाडगे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून मुलीकडुन महिला पोलिस अधिकारी यांनी माहिती घेतली व नितीन राजाराम पवार,वय२८ राहणार पाटखळ माथा सातारा व पुष्कर कांबळे, राहणार सदरबझार सातारा यांच्या वर पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल करून रात्री उशिरा दोघांना अटक केली. दरम्यान सदर घटना समजताच पालक संतापले. यामुळे शाळा मधील मुलांची विशेषतः मुलींची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.