क्रिकेट टीमचे कर्णधार ॲड. संजय जाधव यांच्या नेतृत्वाला यश.

DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाइम
धुळे:- कुंडाणे क्रिकेट मैदानावर धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा 26 जानेवारी रोजी अंतिम सामना प्रमुख जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद यांचे उपस्थित पार पडला त्यात धुळे स्पआर्टन संघ व न्यायिक वर्ग क्रिकेट संघ, यांच्यात झालेल्या अंतीम लढतीत धुळे स्पआर्टन संघ ४० रणांनी विजयी झाला.सदर सामन्यात धुळे स्पआर्टन संघ सलग ४ वेळा मॅच जिंकली आहे.
कुंडाणे क्रिकेट मैदानावर धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने दि.२५ व २६ रोजी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेचे उदघाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद यांचे हस्ते दि.२५/१/२०२५रोजी सकाळी ७:४५वाजता करण्यात आले होते.
दि.२६रोजी झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात न्यायिक वर्ग क्रिकेट संघ व धुळे स्पआर्टन संघ यांच्यात जोरदारपणे लढत झाली. ४० धावांनी धुळे स्पआर्टन संघ विजयी झाला मॅन ऑफ द फायनल मॅचचे मानकरी उज्ज्वल चौधरी ठरले.
वकील वर्ग क्रिकेट संघ, न्यायिक वर्ग, कर्मचारी वर्ग, तालुका वकील संघ, कार्यकारणी क्रिकेट संघ, असे एकूण १३ क्रिकेट संघाने सहभाग घेतला होता. संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, नियोजन तसेच क्रिकेटपटू यांच्यासाठी टी शर्ट, चहापाणी व भोजनाची व्यवस्था आदी धुळे जिल्हा वकील संघाकडून करण्यात आली होती.
विजयी धुळे स्पआर्टन संघाची पूर्ण टीम पुढील प्रमाणे- कर्णधार संजय जाधव, सुनील सोनार, मंगेश सोनवणे, राहूल माळी, श्रीकांत पाटील, नितेश बोरसे, देवेंद्र ठाकरे, गजेंद्र भदाणे, योगेश जाधव, शुभम मोरे, योगेश भदाणे, हर्ष वैद्य, संदीप खलाने, टीम मेंटॉर अशपाक शेख टीम चे फौंउंडर मेंबर रणजीत नगराळे हे होते.
धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.राहूल पाटील, न्यायिक वर्ग, माजी अध्यक्ष शामकांत पाटील, ॲड.दिलीप पाटील, ॲड.बी.डी. पाटील उपाध्यक्ष भिसे, महिला उपाध्यक्ष भावना पिसोळकर, ॲड.यतीश गुजराती, ॲड.कुंदन पवार, ॲड.जितेंद्र निळे, ॲड.सचिन झेंडे, ॲड.राहुल भामरे, ॲड.राजू गुजर, ॲड.मुकुंद माळी, ॲड.हितेश कबाडे, ॲड.गोरक्ष माळी, ॲड.संजय शिंपी व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, वकील वर्ग व तालुका क्रिकेट संघ व क्रिकेटपटू उपस्थित होते.