नंदुरबार – रविंद्र गवळे
शहादा शहरात कडाक्याची थंडी ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता रामप्रहर पासून घरोघरी वृत्तपत्र वितरण करणाऱ्याच्या सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात सर्व प्रथम राष्ट्रपिता म गांधी यांना त्यांचा पुण्यतिथी निमित्ताने पूर्वसंध्येला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र जमादार होते तर प्रमुख पाहुणे डॉ.राजेश जैन,प्रा.आर. टी .पाटील, फेडरेशन अधिकारी माणक चौधरी शाहादा जायन्ट्सचे अध्यक्ष भूषण बाविस्कर सहेली अध्यक्षा दिपाली बाविस्कर सचिव आशा चौधरी आदी उपस्थित होते.यावेळी प्रा आर टी पाटील माणक चौधरी डॉ राजेश जैन रविंद्र जमादार यांनी मार्गदर्शन केले.
वृत्तपत्र वितरण हा प्रसारमाध्यमातील सर्वात शेवटचा घटक आहे. अगदी अत्यल्प वेतनात रक्त गोठविणाऱ्या थंडीतही आपले कार्य करून आपला संसार चालवीत असतात त्यांच्या कार्याची नोंद घेऊन शहादा जायन्ट्स ग्रुपने वृत्तपत्र विक्रेते ऋषिकेश चौधरी, जगदीश चौधरी,विजय मधुकर चौधरी, हरीश बेलदार,दिवाकर बेलदार यांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचल व प्रास्तविक पंकज पाटील यांनी तर आभार भूषन बाविस्कर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी के.के. सोनार,संदिप पवार यांनी परिश्रम केले.