DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी:- मनोहर गोरगल्ले
पिंपरी-चिंचवड:- पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पर्दाफाश केला आहे. कंबोडिया देशातून ही टोळी अनेक भारतीयांना गंडा घालत होती. या टोळीसाठी सक्रिय असणारा भारतातील मुख्य सुत्रधार सॅम उर्फ डेव्हिड उर्फ संबीधकुमार नायकच्या हिंजवडी येथे मुसक्या आळवण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाला यश आले आहे. मुख्य आरोपीसह झारखंड, गुजरात, उडीसा येथील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
नागरीकांना आवाहन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी सेबी पुरस्कत अॅप्लीकेशनचा वापर करावा. शेअर मार्केट गुंतवणुक करण्यासाठी सेबी पुरस्कत अॅप्लिकेशन हे वेगवेगळया खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगत नाहीत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करताना आपण बनावट प्लॅटफार्मवर गुंतवणुक करत नाहीत ना याची खात्री करावी. कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल स्क्रिन, बैंक अकाऊंट, वैयक्तीक माहीती शेअर करु नये, असे आवाहन गुन्हे शाखा पिंपरी-चिंचवडचे पोलीस उप-आयुक्त संदीप डोईफोडे यांनी केले आहे.