DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी:- रविंद्र गवळे
नंदुरबार:- शहादा तालुक्यातील टेंभा बुद्रुक येथे धाडसी घरफोडीत लाखो रुपयांचा एवज लंपास झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.टेंभे बुद्रुक येथील गावाच्या मध्यभागी असलेल्या भरवस्तीतील शेतकरी असलेल्या इंद्रसिंग भीलेसिंग गिरासे यांच्या घराचा लाकडी दरवाज्याचा कडी कोंडा लोखंडी रोडच्या साह्याने तोडून बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून खालच्या व वरच्या मजल्यावर असे तीन गोदरेज कपाट तोडून अज्ञात चोरट्याने ६० ते ७० तोळे सोन्याचे दागिन्यांसह दीड ते दोन लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली ही धाडसी चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.गेल्या १५ दिवसाच्या अंतरावर सारंगखेडा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील सलग चौथी ते पाचवी घटना घडली आहे. त्यात वडाळी येथील घरफोडी सारंगखेडा येथील वाघेश्वरी माता मंदिराची दानपेटी चोरी आठवडे बाजारात मोबाईल चोरी सारंगखेडा येथील सुदाम चौधरी या शेतकऱ्यांचे वीज पंप चोरी तसेच मोटार सायकल चार चाकी अशा विविध चोरींच्या वारंवार होणाऱ्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर ग्रामस्थ प्रश्न उपस्थित करीत आहेत. अनेक घटना चोरीच्या घडूनही पोलिसांकडून एकाही घटनेचा छडा अद्याप पर्यंत लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहादा तालुक्यातील टेंभे बुद्रुक येथील शेतकरी इंद्रसिंग भिलेसिंग गिरासे हे नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथे आपल्या मेहुण्यांचे उत्तर कार्यासाठी गेले होते.सोमवारी संध्याकाळी त्यांचे लहान चिरंजीव यांनी घर बंद करून दोंडाईचा येथील आपल्या रूमवर निघून गेले. त्याच मंगळवारी दिनांक 27 जानेवारीच्या मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून वरच्या व खालच्या मजल्यावर असलेल्या गोदरेज कपाट तोडून जवळपास ६० ते ७० तोळे सोने आणि दीड ते दोन लाख रुपये रोख रक्कम लंपास केली. अशी माहिती घरमालक इंद्रसिंग गिरासे यांनी दिली आहे. यांच्या शेजारीच राहणाऱ्या ताराबाई भरतसिंग गिरासे यांच्या कानावर शेजारी घरात काहीतरी लोखंडी वस्तूंचा आवाज येत असल्याची माहिती राहुल विजयसिंग यांना दिली. राहुल गिरासे यांनी किशोर गिरासे यांना इंद्रसिंग गिरासे यांच्या घरात काहीतरी आवाज येत आहे. आपण पाहणी करावी अशी मोबाईलवर माहिती दिली यावरून किशोर गिरासे आणि त्यांचे वडील राजेंद्र गिरासे यांनी खिडकी उघडून पाहिले असता समोरच्या घरात दोन ते तीन व्यक्ती उभे असून ते काहीतरी चोरीच्या इराद्याने आले असावेत असा संशयाने त्यांनी मागच्या दरवाजाने जाऊन गल्लीतील इतरांना जागे करत घराकडे धाव घेता तिथून चोरटे तापी नदीच्या नदीच्या दिशेने पसार होण्यास यशस्वी झाले. चोरट्यांनी शेजारच्या अंगणात खाटेवरझोपलेल्या पाहुणे म्हणून आलेल्या वृद्ध उठून बघताच त्याला हातातील लोखंडी टॉमी यांचा धाक दाखवत दमदाटी करून झोपण्यास सांगितले अन्यथा डोक्यात वार करू असे सांगितले त्या वृद्धाने घाबरून कोणताही आवाज न करता पलंगावरच झोपी गेले. गावातील छोटू गिरासे, सुरेंद्र गिरासे यांनी प्रत्यक्ष पाहिले मात्र शेजारी दीपक भगवानसिंग गिरासे यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने रात्रीची लाईट नियमित असल्याने सेंटिंग काम सुरू होते यांना या कामावरील मजूर असावेत असे वाटले तोपर्यंत गावातील शेजारी घराजवळ आले असता चोरी झाल्याची घटना त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रात्री तीन वाजता घरमालक इंद्रसिंग यांना माहिती दिली. इंद्रसिंग गिरासे यांना दोन मुले असून मोठा मुलगा पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरीला आहे. तर दुसरा मुलगा लहान मुलांच्या शिक्षणासाठी दोंडाईचा येथे रूम करून राहतो जवळपास दोघेही सुनां व पत्नीचा मुलांचा नातवंडांचा सर्व मिळून जवळपास ७० ते ८० तोळे सोन्याची दागिने व रोख दीड ते दोन लाख रुपये रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती इंद्रसिंग गिरासे यांनी दिली त्यांनी तात्काळ रात्रीच सारंगखेडा पोलीस स्टेशनला संपर्क साधून घटनेची माहिती दिली सकाळी फॉरेन्सिक पथक व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले व तज्ञांनी ठशांचे नमुने घेतले.चोरी झालेल्या घरापासून शेजारी तापी नदी पात्रापर्यंत श्वानपथकाने माग दाखवले. पुन्हा श्वान चोरी झालेल्या घरापर्यंत थांबले घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी भेट दिली. सारंगखेडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. फॉरेन्सिक पथकात पोलीस हेड कॉ संजय रामोळे, स्वानपथकात दिलीप गावित, देविदास नाईक , पी.ए .साठे आदींसह कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू होती.सदर चोरीची घटनेचे सारंगखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सारंगखेडा पोलिसांना चोरट्यांकडून आवाहन वर आवाहन दिले जात आहे.
*(चौकट)*
*पोलिसांबद्दल ग्रामस्थांची तीव्र नाराजी*
गेल्या पंधरवड्यात मध्यरात्री वडाळी येथे एका शिक्षकाच्या घरी धाडसी चोरी करून सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोख असा लाखो रुपयाच्या ऐवज लांबवला होता. त्यानंतर सारंगखेडा येथील वाघेश्वरी मातेच्या मंदिराची दानपेटीत फोडून रकमेची चोरी तसेच टेंभा रस्त्यावरील तापी नदी काठावरील वीज पंप चोरी या अशा एकपाठोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच असूनही सारंगखेडा पोलिसांकडून एकही चोरीच्या घटनेच्या तपास न लागल्याने चोरांचे धाडस निर्माण होत पुन्हा टेंभे बुद्रुक येथील एका शेतकरी कुटुंबात बाहेरगावी गेल्याच्या फायदा घेत चोरट्यांनी लाखो रुपयाचे सोने-चांदीचे दागिन्यांसह रोख रकमेची धाडसी चोरी केल्याने सारंगखेडा पोलीस कार्यक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी जिल्ह्याला कर्तव्यदक्ष लाभलेले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन चोरीच्या छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
टेंभे बुद्रुक हे गाव तापी नदीच्या काठावर गाव असून समोरून तापी नदीच्या पलीकडच्या काठावर धुळे जिल्हा हद्द आहे.चोरटे येताना गावातूनच आले मात्र जाताना वडदे चवळदे या नदी काठावर असलेल्या गावांकडून चोरटे डुंगिने किंवा ट्यूब च्या साह्याने पसार झाले असावेत असा कयास लावला जात आहे. कारण तापी नदीवर बसवलेल्या विद्युत मोटारी जवळ शेकोटी पेटवलेली होती व श्वानाने तिथपर्यंतच माग दाखवले. त्यामुळे तेथून चोरी करून त्याच मार्गाने गेले असल्याचे संशय श्वान पथक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.टेंभे बु. गावात राजपूत समाजाची वस्ती ही गावातील मध्य भागात अगदी दाट वसलेल्या भागात असून भरवस्तीत आहे चोरट्यांकडून गावातील गल्लीबोळात फिरून अगोदर पूर्ण माहिती काढूनच एवढी मोठी धाडसी चोरी सराईत गँगच्या द्वारे झाली असावी व आमच्या गावात प्रथमच एवढी मोठी सोन्या चांदीची दागिने व रोख रकमेची चोरी झाल्याने गावात घबराटीचे वातावरण पसरल्याचे ज्येष्ठ नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.