DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
नांदेड:- मा. श्री.अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड व त्यांच्या सौभाग्यवती मा. श्रीमती डॉ. गर्विता सिंग मॅडम यांचे संकल्पनेतुन नांदेड पोलीस दलातील पोलीस कुटुंबियांकरिता स्नेहमेळावा व हळदी-कुंकु तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस दलातील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार हे सतत चोवीस तास कर्तव्य पार पाडत असतात त्यांच्या कुटूंबियाकरीता मनोरंजनासाठी सदर स्नेहमिलन व हळदी-कुंकाचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातुन सदर महिंलाना आपल्या कला गुणांना वाव देण्याची संधी मिळाली आणि ते सर्व एकत्र आल्यामुळे सर्व पोलीस परिवाराचे संबध अजुन घनिष्ट झाले. सदर कार्यक्रमाकरीता वरिष्ठ नागरीक व एकल महीला, सफाई कामगार यांच्या कुटूंबियाना व अंशकालीन कर्मचार्याना व त्यांच्या परिवाराना एकत्र मनोरंजनाची संधी प्राप्त झाली.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. सदर स्नेहमेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रमात विवीध खेळ, प्रश्नमंजुषा व नृत्य यांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी नांदेड शहरातील सर्व पोलीस कुटूंबीय, विवीध शासकीय कार्यालयातील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना निमंत्रीत करण्यात आले. सर्वानी उत्स्फुर्तपणे मोठया संख्येने यामध्ये सहभाग नोंदवला. भरोसा सेल, बीडीडीएस कार्यालय, पोस्टे भाग्यनगर, शिवाजीनगर, माळाकोळी, हदगांव व पोलीस अधीक्षक कार्यालयातील विवीध शाखामधील महिला पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी बहारदार नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. त्याचबरोबर या नृत्य कार्यक्रमातुन “बेटी बचाव बेटी पढाव” हा संदेश देण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस देण्यात आले. तसेच महिलांकरीता लकी ड्रॉ पैठणी स्पर्धा घेण्यात आली यामध्ये सौ. सुचिता कांबळे हया पैठणी साडी विजेत्या ठरल्या.
सदर कार्यक्रमाचे नियोजन मा. श्रीमती डॉ. अश्विनी जगताप मॅडम, पोलीस उप अधिक्षक (मु) नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती अरूणा सुगावे मॅडम, ने. बीडीडीएस नांदेड, मसपोनि श्रीमती बोरसे, ने. विमानतळ सुरक्षा, मपोउपनि माया भोसले, स्नेहा पिंपरखेडे, जयश्री गिरे, नमिता देशमुख, रेणुका जाधव, किरण बेंबडे, शालिनी गजभारे यांनी केले.