नांदेड जिल्ह्यामध्ये 1500 रुपये मध्ये ग्रामसेवक तर 3 हजार रुपयांमध्ये बांधकाम अधिकारी यांच्यासहीचे व स्टॅम्पचे कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र बनून मिळत आहे..
*कामगारांना कागदपत्रांसाठी मोजावे लागत आहेत 1500 ते 3000 रुपये पैसे दिले की 100% काम होणारच असे सुद्धा समोर आलेले आहे.
*पैसे न देणाऱ्या कामगारांना रोजी रोटी बुडवून चपल्या घासून सुद्धा काम होत नाही.
*महाराष्ट्र शासनाकडून असंघटित कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना*
DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाइम
प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
नांदेड: असंघटित कामगारांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. मात्र, त्याबाबत संबंधित कामगार अनभिज्ञ असल्याने त्यांना या योजनांचा लाभ घेता येत नाही. नांदेड जिल्हा विभागात अनेक बांधकाम प्रकल्प सुरू आहेत.
परंतु यातील अनेकांना शासनाच्या या योजनांची माहिती नाही. असा कामगारांची शासकीय दप्तरी नोंद करण्याबरोबरच त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार आता केवळ एक रुपयात कामगारांना आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. या योजना कामगारांसाठी फायदेशीर असून लाभ कामगारांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे
*नोंदणी फक्त एक रुपयात*
यापूर्वी कामगार नोंदणीसाठी ८५ रुपये आकारले जात होते. त्यामुळे अनेक कामगार नाय नोदणी करण्यास पुढे येत नसत. परंतु, कामगार मंडळाने आता वर्षाला फक्त एक रुपयात नॉटणी करण्याचा निर्णय घेतला आहे..
गृहकर्जासह विविध योजना
कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती
कामगार कल्याण मंडळाकडे नाव नोंदणी करणाऱ्या कामगाराला घरबांधणी किया घरखरेदीसाठी घेतलेल्या कर्जावरील सहा लाख रुपयापर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. इतर स्वरूपाच्या जवळपास ३२ योजनाचा लाभ घेता येतो.
शासनाची फसवणूक करणाऱ्या वरती आळा बसेल का असा प्रश्न जनतेमध्ये पडलेला आहे जे लोक कामगारांकडून पैसे घेत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असे गरीब कामगारांचे मत आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरच त्यांचे धागेद्वारे आवळून का कामगारांना न्याय मिळवून द्यावे.