Dpt news network – एरंडोल येथील रंगारी खिडकी ते गांधीपुरा या पुलाचा भुमीपुजन सोहळा पार पडला.पुलाचे भुमीपुजन योग शिक्षक पी.ओ.बडगुजर सर व हाजी अहमद खॉ करीम खाँ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा राज्य जनजातीय क्षेत्र प्रमुख एड.किशोर काळकर होते.यावेळी नथ्थू बापू दरगाह पासुन बाजारपेठेतून ढोल ताशांचा गजरात मेनरोड मार्गे मिरवणूक काढण्यात आली . छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माजी उपनगराध्यक्ष नितीन चौधरी( बबलु पहेलवान) व भाजपचे तालुकाध्यक्ष मच्छींद्र पाटील यांचा हस्ते माल्यार्पण करणयात आले.
भुमीपुजन प्रसंगी मच्छींद्र पाटील , राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष व नगरसेवक प्रा.मनोज पाटील,डॉ.सुरेश पाटील,जहिरोद्दिन शे.कासम ,नगरसेविका छायाताई दाभाडे , जयश्रीताई पाटील , बबलु पहेलवान ,डॉ.नरेंद्र पाटील , अभिजीत पाटील, शकुर मोमीन , अस्लम पींजारी , सरलाताई पाटील , अँड अहमद सैय्यद , ईश्वर बिऱ्हाडे , अमोल जाधव , दिपक अहीरे , सचिन विसपुते , भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सर्व पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते .