DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
मिरज प्रतिनिधी – राजेंद्र पवार
Sangli News : १३ लाख ४९ हजार ८४९ रुपयांची ३१ टन
साखर ट्रक भरून घेऊन ती पनवेल येथील अपोलो लॉजिस्टीक पनवेल येथे पोहोचवणे अपेक्षीत असताना परस्पर साखरेचा अपहार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मिरज : आरग (ता. मिरज) येथील मोहनराव शिंदे साखर
कारखाना येथून १३ लाख ४९ हजार ८४९ रुपये किमतीची ३१ टन साखर ट्रकमध्ये भरून घेत ती अपेक्षित ठिकाणी न पोहोचवता परस्पर त्याचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रोहित राजशेखर सावळे (रा. लक्ष्मी मंदिरजवळ, सांगली) यांनी अशोक निळे (रा. व्हसपेठ, ता. जत), पैगंबर शेख (रा. मिरज) आणि सूरज सय्यद (रा. मिरज) यांच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २४ ते २९ मार्च या कालावधीत हा प्रकार घडला.
सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, गाडी मालक निळे, त्याचा मित्र पैगंबर शेख व गाडीचा चालक सूरज सय्यद यांनी संगनमत करुन आरग येथील मोहनराव शिंदे साखर कारर येथून १३ लाख ४९ हजार ८४९ रुपयांची ३१ टन साखर ट्रव भरून घेऊन ती पनवेल येथील अपोलो लॉजिस्टीक पनवेल येथे पोहोचवणे अपेक्षीत असताना परस्पर साखरेचा अपहार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.