(उल्हासनगर येथे अनोखे अभिवादन; चित्रातून मानाचा मुजरा)
DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
उल्हासनगर:- शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक अनोखा आणि कलात्मक अभिवादनाचा सोहळा अनुभवायला मिळाला. चित्रकाराच्या प्रतिभासंपन्न हातातून जन्म घेतलेली ही कलाकृती केवळ चित्र नसून, बाबासाहेबांच्या विचारांप्रती सच्चा आदर व्यक्त करणारा एक संदेश आहे. विशेष म्हणजे, बाबासाहेबांनी
लिहिलेल्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपीज’ या ऐतिहासिक प्रबंधाला साक्ष देणाच्या ‘रुपया’ माध्यमातून त्यांना मानवंदना अर्पण करण्यात
आली आहे.उल्हासनगर शहरातील चित्रकार राहुल कीर्दक यांनी बाबासाहेबांना एका आगळ्या वेगळ्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने आदरांजली वाहिली. चित्रकार राहुल कीर्दक यांनी प्रतीकात्मक नाण्यावर डॉ.बाबासाहेबांचे चित्र रेखाटून त्यांना मानवंदना अर्पण केली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपीज’ या आपल्या प्रबंधातून अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास मांडणारे विचारवंत होते. त्यांच्यां त्या विचारांना मान्यता देणाऱ्या रुपया या माध्यमातूनच त्यांना आदरांजली वाहण्याची संधी मला मिळाली,हे माझे भाग्य आहे. या कलाकृतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेड़कर हे केवळ चित्र रूपात नव्हे तर मूल्यरूपात साकारले गेले आहेत. ते या देशाचे खणखणीत नाणे आहेत. त्यांचे चित्र रेखाटून त्यांना कलात्मक अभिवादन केले.
असे प्रतिपादन चित्रकार राहुल कीर्दक यांनी केले,
या चित्रकाराने एका रुपयाच्या प्रतिकात्मक नाण्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अचूक आणि भावस्पर्शी व्यक्तिचित्र साकारत कलात्मकतेच्या माध्यमातून एक प्रभावी सामाजिक संदेश दिला आहे.
चित्रकार राहुल कीर्दक तसे विदर्भातील मुर्तिजापूर मधील माना या गावातील आहेत, मुंबईत येऊन त्यांनी ३० वर्षे चित्रकारीतेमध्ये तपश्चर्या आणि साधना केली. त्याचे फळ आणि सिध्दी आता मिळत आहे. याचे समाधान ते व्यक्त करताना दिसतात.
त्यांची पेंटिंग्ज जगभर विकली जातात आणि पाठविली जातात . या चित्रकाराने अनेक बॉलिवूड चित्रपटांमधील शुटिंग दरम्यान सेट चे काम केले आहे.
तरी ही त्यांच्या मुखावर कधी ग गर्वाचा दिसला नाही हे त्यांच्या स्वभावावरून दिसून येते.