DPT NEWS 🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – निवास गागडे
इचलकरंजी:- अखिल भारतीय सहंसमल भांतू समाज संघ यांच्यावतीने कोल्हापूर जिल्हा एकत्रित करून कंजारभाट समाजाने इचलकरंजी थोरात चौक येथे मुक्ती दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुक्ती दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील मलके,राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र भाट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूर हे होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत असलेल्या पाहुण्यांच्या हस्ते महामानवांचे फोटो पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. सन १९४७ भारत स्वतंत्र झाला त्यापूर्वी ब्रिटिश सरकारने १५० वर्ष भारतावर राज्य केले त्या काळात भटक्या जाती-जमातीच्या लोकांना क्रिमिनल ऍक्ट म्हणून गुन्हेगार हा शिक्का मारला होता. भारतात असलेल्या भटक्या जाती जमाती महिला पुरुष मुलांना तारेच्या कुंपणात कैद करून ठेवण्यात येत होते. तारेच्या कुंपणातून बाहेर जायचे असल्यास हजेरी लावून बाहेर जाणे व हजेरी लावून परत येणे वेळेत न आल्यास त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार, मारहाण करत असा जुलमी कायदा भोगावा लागला. भारत देश स्वतंत्र होऊन देखील त्यांची मुक्तता झाली नव्हती. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत देश स्वातंत्र्याच्या पाच वर्षानंतर. सन १९५२ साली सोलापूर या ठिकाणी कैद असलेले भटक्या जाती जमातीच्या लोकांना कुंपणाची तार कट करून मुक्तता केली. तो दिवस म्हणजे 31 ऑगस्ट मुक्ती दिवस आज देश साजरा करत आहे. मुक्ती करून ७४ वर्षे झाली असली तरी आज तगायत भटक्या जाती जमातीचा समुह काही गोष्टी पासून वंचित आहे. शासनाने ३१ जुलै २०२५ रोजी जी.आर. लागू केला आहे. भारतातील संपूर्ण भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी सर्वत्र ३१ऑगस्ट मुक्ती दिवसाचा कार्यक्रम घेण्यात यावे अशा सुचना देण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कंजारभाट समाजाने मुक्ती दिन कार्यक्रम घेत शासनाकडे मागण्या करण्यात आल्या आहेत. भटक्या विमुक्त जातीकरिता जातपडताळणी साठी १९६१ सालापासूनचे पुरावे मागितले जाते. परंतु कंजारभाट समाज हा कुंपणातून मुक्त केलेपासून प्रत्येक गावामध्ये स्थायिक होणेस किमान २५ वर्षे कालावधी गेला तरी १९६१ पासून पुरावा मागण्याऐवजी सन १९७४ पासून पुरावे मागण्यात यावे.भटक्या विमुक्त जाती जमातीचे महामंडळामार्फत सुशिक्षित तरुण पिढीकरिता उद्योग करण्याकरिता मार्गदर्शन तसेच उद्योग उभा करण्याकरिता, शासन स्तरावर कार्यशाळा आयोजित करणेत याव्यात. कंजारभाट समाजाकरिता भूमिहीन लोकांना शेती करणेकरिता जिल्ह्यामध्ये शेत जमीन मिळावी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील व कोल्हापूर जिल्ह्यातील कंजारभाट समाजातील निराधार लोकांना गृहनिर्माण संस्थेकरिता शासनामार्फत शासकीय जमीन मिळाव्यात.महिला सक्षमीकरण अंतर्गत बचत गट निर्माण करणेकरिता मार्गदर्शन तसेच नवीन गृह उद्योग करणेकरिता कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशा अनेक मागण्या शासनाकडे केलेल्या आहेत. समाजाने मागणी केलेल्या मागण्या करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहेत. कार्यक्रमामध्ये आमदार राहुल आवाडे. मा.आमदार राजीव आवळे भटक्यांचे वक्ते मच्छिंद्र भोसले. नगरसेवक श्रीरंग खवरे,मदनराव कारंडे विठ्ठल चोपडे, राहुल खंजीरे अब्राहम आवळे या सर्वांना एका मंचावर बोलवून कंजारभाट समाजाचे माजी नगरसेवक नरेश नगरकर यांनी कंजारभाट समाजाच्या व्यथा मांडल्या. आमच्या मुलांना जातीचे दाखलेचा सन ६१ चा पुरावा रद्द करून सन ७५ च्या पुराव्या नुसार दाखल करून मिळावेत,भटक्या विमुक्त जाती जमातीची कंजारभाट समाजाची सोसायटी मंजूर व्हावी, बेरोजगार महिलांना रोजंदारीसाठी काम मिळावे, आमच्या मुलाबाळांना नोकऱ्या मिळाव्यात, कंजारभाट समाजाला वैयक्तिक घरकुल योजना मंजूर व्हावी, शासनाने २०० दारू लायसन्स मंजूर केलेले आहेत. त्यापैकी काही लायसन्स कंजारभाट समाजाच्या लोकांना देखील मिळावेत, समाजातील मुलांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी मोफत सुविधा व्हावी. कंजारभाट समाज दारू गाळणारा समाज म्हणून ओळखला जात होता. भविष्यात इतर समाजाप्रमाणे सुशिक्षित समाज म्हणून ओळख निर्माण करीत आहे. माजी आमदार राजीव आवळे यांनी सर्व समाज एकत्रित आला म्हणून सर्वांचे मनापासून अभिनंदन करून आभार मानत असेच संगठीत राहून एकीचे बळ वाढवा आणि शासनाच्या दारीं जाऊन आपल्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळावीता येईल त्याचा पाठपुरावा करा. समाजातील मुला-मुलींना भरपूर शिकवून डॉकटर, वकील, इंजिनियर, पी.एस.आय. आयपीएस अन्य डिगऱ्या घेऊन पुढच्या पिडीला भविष्य द्या.जिथे जिथे आमची गरज लागेल तीथे आम्ही सर्व मिळून आपणास मदत करु असे अव्हानात्मक बहुमुल्य मार्गदर्शन केले. विद्यमान आमदार राहुल आवाडे यांनी आपल्या राजकारणाच्या तिसऱ्या पिढीचा इतिहास सांगत असता कंजारभाट समाजाचा उल्लेखनीय सिंहाचा वाटा आहे व त्यांना आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आत्ता तुमच्या निवेदनाद्वारे मागण्यात आलेल्या मागण्या तुम्हाला मिळाल्याच पाहिजे समाजाच्या सर्व मागण्या शासनापर्यंत पोहोचवून आपणास त्या कशा मिळतील यासाठी नक्कीच लक्ष घालून आपण काम करू अशी ग्वाही दिली. कोल्हापूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिता नेर्लीकर यांनी कंजारभाट समाजाच्या मुला मुलींच्या शिक्षणासंदर्भात माहिती देत समाजातील अनाथ मुला मुलींना शासनाच्या २० अनाथ आश्रमाच्या संदर्भात माहिती देऊन शिक्षण व राहण्याची सोय मोफत कसे मिळेल. त्या संदर्भात माहिती दिली. भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या लोकांसाठी वैयक्तिक विभाग केला असून त्यामध्ये आपणास कोण कोणते फायदे घेता येईल त्यासंदर्भात क्यू.आर. कोड संबंधी मोबाईल द्वारे माहिती घ्या व आपणास लागेल ती मदत करू असे आश्वासन दिले.
अखिल भारतीय सहंसमल भांतू समाज संघाचे अध्यक्ष सुनील मलके व समर्थ सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज यांनी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शनवून मार्गदर्शन दिले. प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. इचलकरंजी मंडल अधिकारी राजेंद्र बावणे यांच्या हस्ते कंजारभाट समाजाच्या शाळकरी मुलांचे १०० जातीचे दाखले वाटप करण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हयाचे मान्यवर ह भ प विष्णूपंत नेतले, ह भ प अशोक नाथ गागडे, ह भ प जगदीश मछले,गोविंद टिळंगे, नरेश नगरकर, सुरसिंग मिणेकर, दिलीप बाटुंगे, प्रताप बागडे, संदेश बागडेकर, जयसिंग नेतले, वसंत तमायचे, अजित मिणेकर, उदय चंद गागडे, काळू सिंग माछरे, जनार्दन गुमाने, विलासराव नवले, राजेश नवले, लालसिंग माछरे, चंद्रकांत टिळंगे,राजेश रावळकर, मोहन नवले, सुरज मिणेकर, मुन्ना भाट, मनोज भाट दीपक माछरे मुकुंद गागडे, विष्णू गुमाने, प्रकाश गुमाने, कुमार बागडे, महेश मछले, निलेश मछले, राहुल मिणेकर, प्रकाश मिणेकर, शक्ती बाटुंगे, हसन मलके, विष्णू भाट, प्रकाश रावळकर, रामभाऊ बाटूंगे, राकेश तमायचे, आकाश गागडे, गणेश माछरे, बबलू गागडे, उमेश गागडे, अशोक बाटुंगे, तलाठी महेश भाट, तलाठी सोहन नवले, पप्पू नगरकर, राहुल नगरकर, शक्ती गागडे, आकाश टिळंगे, विकास टिळंगे, पंकज गागडे, शैलेश गागडे, चंद्रकांत घारुंगे, पप्पू नवले, धर्मेंद्र मलके, दिलीप बाटुंगे घारूंगे, महेश नगरकर दिनेश नगरकर, राजू मिणेकर, राजेश मिणेकर आयजीएम, अशोक तमायचे किरण गागडे, कैलास गागडे, शिरोळ इंद्रजीत गागडे, विशाल घारुंगे, सुरज नेतले, हरी नेतले स्वानंद नेतले, रोहन नेतले जगदीश रजपूत, प्रा. उमेश मिणेकर, महेश मिणेकर, त्यागराज गागडे, गणेश बाटुंगे चंद्रकांत नगरकर, संजय नगरकर धीरज तमायचे, रणजीत गागडे बरसात गागडे, सनी नवले, मुकेश माछरे, नरेश गागडे, विनोद गागडे गौतम नवले, संतोष गागडे, करण गागडे, सनी गागडे, राजेश गागडे संजय गागडे, सुदेश गागडे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निवास गागडे यांनी सर्वांचे आभार माणुन कार्यक्रमाची समाप्ती भांतु गीताने केली.



