प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – पुष्पा चित्रपट सर्वत्र धुमाकूळ घालत आहे.या चित्रपटाचे फिवर अनेकांवर चढले आहे . सामान्य नागरिक या चित्रपटाच्या गाण्यांवर सोशल मीडियावर व्हिडिओ काढून विरंगुळा करीत आहेत . या चित्रपटात अल्लू अर्जुन याने पुष्पाचे व्यक्तिरेखा साकारत दुधाच्या टँकर मध्ये रक्त चंदनाची अवैध तस्करी करीत होता . त्याच्या सारखे दारूची तस्करी करण्यासाठी चक्क ट्रॅक्टर मधील शेणखतातून दारूची तस्करी करताना एकाकडून पोलिसांनी ९ लाखाच्या अवैध दारूसह १६ लाख १० हजार ८० रुपयांच्या मुद्देमालासह जप्त करीत त्याला ताब्यात घेतले .
या बाबत अधिक माहिती अशी की , महाराष्ट्र पोलीस पोलीस उप – महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांचे आदेशान्वये संपूर्ण -नाशिक परिक्षेत्रात अवैध दारू तस्करांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे सक्त निर्देश अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक 13/02/2022 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री . पी . आर . पाटील यांना बातमी मिळाली की दिनांक 14/02/2022 रोजी मध्यरात्री मंदाणा ता . शहादा गावाकडुन एक लाल रंगाचे ट्रॅक्टरमध्ये शेणखत भरलेले असून त्याखाली देशी विदेशी दारुचे खोके ठेवून अवैध देशी विदेशी दारुची चोरटी वाहतुक करणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली होती , त्या अनुषंगाने मा . पोलीस अधीक्षक , नंदुरबार श्री . पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . रविंद्र कळमकर यांना सदर माहिती कळवून योग्य ते मार्गदर्शन करुन तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशीत केले . त्या अनुषंगाने मा . पोलीस अधीक्षक श्री . पी . आर . पाटील , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार केले . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पिंपड़े ता . शहादा गावाच्या पूढे रस्त्यावर दिदबा धरून बसले असता 00.45 वा सुमारास असलोद गावाकडुन पिंपड़े गावाकडे एक लाल रंगाचे ट्रॅक्टर येतांना दिसले म्हणून पथकातील अमंलदारांनी त्यास हाताने व बॅटरीच्या सहायाने ट्रॅक्टर उभे करण्याचा इशारा देवून ट्रॅक्टर थांबविले . त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या अमंलदारांनी आपली ओळख देवून ट्रॅक्टर चालकास नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव लखन ऊर्फ गणेश दला भिल वय -28 रा . वाडी बुद्रुक ता . शिरपुर जि . धुळे असे सांगितले . ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टरमध्ये काय भरलेले आहे बाबत विचारपुस करता त्याने ट्रॅक्टरमध्ये शेणखत भरलेले आहे • बाबत सांगितले मिळालेल्या बातमीप्रमाणे ट्रॅक्टरमध्ये शेणखत दिसून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टरमधील शेणखत बाजुला केले असता तेथे विदेशी दारुचे कादी पृष्ठाचे खोके ठेवलेले मिळुन आले . ट्रॅक्टर चालकास दारु वाहतुकीचा परवाना आहे काय ? असे विचारले असता त्याचेकडे दारु वाहतुकीचा परवाना नसल्याचे कळविले . तसेच ट्रॅक्टर चालकास सदरचा माल कोणाकडून आणला बाबत विचारले असता त्याने बोराडी ता . शिरपुर येथील पिंटू पाटील पूर्ण नांव माहित नाही याचेकडून घेवून अक्कलकुवा गावाच्या पुढे 2 ते 3 . कि.मी. वर सेडणेकामी घेवून जात आहे बाबत संपूर्ण माहिती दिली . सदर ट्रॅक्टरमधील संपूर्ण शेणखत बाजुला करून पाहता त्यात खाकी रंगाचे खोके दिसुन आल्याने खोके उघडुन पाहिले असता त्यात 6 लाख 86 हजार 400 रुपये किमंतीची बॉम्बे व्हिस्कीच्या 180 एम.एल.चे एकुण 110 बॉक्स व त्यामध्ये 5280 सिलबंद काचेच्या वाटल्या , 1 लाख 68 हजार 480 रुपये किमंतीची किंगफिशर स्ट्राँग बिअरचे 500 एम.एल. चे एकुण 39 बॉक्स व त्यामध्ये 936 बिअरचे पत्रटी टिन , 55 हजार 200 रुपये किमंतीची माऊन्टस -6000 सुपर स्ट्राँग बिअरचे 500 एम . एल . चे एकुण 20 बॉक्स व त्यामध्ये 480 बिअरचे पत्रटी टिन , तसेच 7 लाख रुपये किमंतीचे एक महिलंद्रा कंपणीचे 575 DI XP PLUSE मॉडेल असलेले लाल रंगाचे ट्रॅक्टर व मागे ट्रॉली विना नंबरचे असलेले असा एकुण 16 लाख 10 हजार 080 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आला आहे शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे . सदरची कारवाई मा . पोलीस अधीक्षक श्री . पी . आर . पाटील , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक विकास कापुरे , पुरुषोत्तम सोनार , पोलीस शिपाई विजय ढिवरे यांचे पथकाने केली असुन मा . पोलीस अधीक्षक , नंदुरबार श्री . पी . आर . पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे ,