नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जामतलाव येथून वनविभागाने केले दीड लाखांचे लाकूड जप्त

प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार -नवापूर तालुक्यातील जामतलाव येथे वनविभागाचे पथक गस्ती घालत असताना रस्त्याच्या बाजूला नाल्यात अवैधरित्या साठवून ठेवलेले घडतळ केलेले लाकूड आढळून आल्याने सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे लाकूड जप्त करण्यात आले आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , सहाय्यक वनसंरक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून जामतलाव येथे अवैधरित्या लाकूड साठवून ठेवले असल्याची माहिती मिळाली . त्यानुसार वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक व चिंचपाडा प्रादेशिक वनक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक व चिंचपाडा प्रादेशिक यांचेसह जामतलाव गावात जाऊन जामतलाव गावातील नाल्यात व रस्त्याच्या बाजूला पायी फिरून पाहणी केली असता नाल्यात गवताखाली खैर प्रजातीची लाकडेकुऱ्हाडीने घडतळ केलेले खैराचे ८१ नग मिळून आले . सदर मालाची बाजार भावानुसार किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे . सदरच्या कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार व धनंजय पवार व श्रीमती स्नेहल अवसरमल , वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक शिवाजी रत्नपारखे , वनक्षेत्रपाल चिंचपाडा प्रादेशिक भिवाजी दराडे , वनपाल ए . एम . शेख , वनपाल बोरझर पी . एस . पाटील , वनपाल सुनिता पाटील , वनपाल वडकळंबी , वनरक्षक कल्पेश अहिरे , कमलेश वसावे , संतोष गायकवाड , विकास शिंदे , दीपक पाटील , अशोक पावरा , लक्ष्मण पवार , गिरीश वळवी , पिंकी बडगुजर , भाग्यश्री पावरा , दिपाली पाटील , अनिल वळवी , अमोल गावित , तुषार नांद्रे , रामदास पावरा , संजय बडगुजर , मनीषाजाधव , पी.टी. खैरनार , देवमन सूर्यवंशी , कविता गावित , वाहन चालक लालु पवार , दिलीप गुरव , वनमजूर छगन सोनवणे , बाळा गावित आदींच्या पथकाने केली आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:26 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 33 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!