प्रतिनिधी-:भुवनेश दुसाने
दि. १० मार्च २०२२
पाचोर्यातील धक्कादायक घटना आईच्या चारीत्र्यावर घेतलेल्या संशयावरून दोन्ही मुलांनी पित्याची केली हत्या.आरोपी अटक व गुन्हा दाखल
आईच्या चारीत्र्यावर वडिलांनी संशय घेतल्यामुळे घरात आई व वडिलांमध्ये भांडणास सुरुवात झाली. वडिलांनीच आपल्या आईच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे हा प्रकार मुलांना सहन झाला नाही व हे भांडण इतक्या टोकाला गेले की या झालेल्या टोकाच्या भांडणातून दोघा मुलांनी
दिनांक ०९/०४/२०२२ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास
पित्यावर धारदार चाकूचे सपासप २७ वार केल्याने पित्याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक पाचोरा शहरातील भास्कर नगरात रविवारी मध्यरात्री घडली. संजय बंकट खेडकर (४६) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून खून याप्रकरणी मयताची मुले रोहित उर्फ रोहित खेडकर वय (२२) मनोज खेडकर वय (२४) वर्षे या भावंडांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.
आईच्या चारीत्र्यावर घेतलेल्या संशयावरून पित्याची केली हत्या. आरोपी अटक व भावी कलम ३०२,३४ गुन्हा दाखल
पाचोरा शहरातील भास्कर नगरात खेडकर कुटुंब वास्तव्यास आहे. संजय खेडकर हे इलेक्ट्रीकल व्यावसायीक असून त्यांचे पाचोरा शहरात इलेक्ट्रीक दुकान आहे. खेडकर हे पत्नीच्या चारीत्र्यावर सतत संशय घेत असल्याने कुटुंबात शनिवारी रात्री जोरदार भांडण झाले. हे भांडण शनिवार रात्री ते रविवार मध्यरात्री पर्यंत सुरूच होते. जन्म देत्या आईच्या चारीत्र्यावर वडिलांनीच संशय घेतल्यामुळे दोघेही मुले प्रतीक उर्फ रोहित संजय खेडकर व मनोज संजय खेडकर कमालीची चिडले होते.
यातच भाडण सुरु असतांनाच शाब्दिक चकमकीने टोकाची भूमिका गाठली चिडलेल्या मनोज व प्रतीक उर्फ रोहित या दोघ मुलांनी रागा, संतापाच्या भरात घरातील धारदार चाकूने वडिलांच्या पोटावर व डोक्यावर सपासप वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची प्रथम माहिती समोर येत आहे. ही घटना रविवार रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिस उपअधिक्षक भरतजी काकडे व पोलिस निरीक्षक नजन पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. समोरील परिस्थिती व मिळालेल्या माहितीनुसार मयत संजय बंकट खेडेकर यांच्या रोहित उर्फ प्रतीक व मनोज या सख्या मुलांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली असून या संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपअधिक्षक भरतजी काकडे व पोलिस निरीक्षक नजन यांच्या मार्गदर्शनाखाली
स.पो निरी. राहुल मोरे,म.पो.उप. विजय विसावे, हे तपास करीत आहेत.