नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

*डॉक्टरला मारहाण करून लुटल्याप्रकरणी एकास अटक व तिघे फरार*
जत तालुक्यातील गुळवंची येथील घटना



प्रतिनिधी : रमजान मुलानी


जत : गुळवंची (ता. जत) येथील एका डॉक्टरला अडवून मारहाण करून लुटल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. बिरुदेव भोलेनाथ लोखंडे (वय २२, रा. लकडेवाडी, ता. जत) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. यातील तिघे फरार झाले आहेत. संशयित लोखंडे याला न्यायालयासमोर उभे केले असता दहा जूनपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने दिली आहे. फरार असलेल्या संशयित आरोपीची नावे लखन गायकवाड (रा. सांगली) लहू घागरे (रा. ढालगाव) अक्षय ढवळे (रा. यवत, जि. पुणे) अशी आहेत. लोखंडे या संशयित आरोपीस दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान लवटे यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी वाळेखिंडी (ता. जत) येथील डॉक्टर सतीश भीमराव शिंदे हे खासगी वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांचे धावडवाडी येथे नवजीवन क्लिनिक या नावाचा दवाखाना आहे. ते गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धावडवाडी येथून वाळेखिंडीला जात होते. दरम्यान, ते गुळवंची रेल्वे फाटकाजवळ आले असता तिघा अनोळखी व्यक्तीनी अचानक मोटरसायकल समोर थांबवून मोटरसायकलची चावी हिसकावून डॉक्टर यांना खाली पाडले. लाथा बुक्क्याने मारहाण करत चाकूने वार केले. डॉक्टर शिंदे यांचे हात व तोंड टॉवेलने बांधून खिशातील रोख रक्कम ४२ हजार व विवो कंपनीचा मोबाईल व युनिकॉर्न मोटरसायकल असा सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लूटमार करून नेला होता. गुरुवारी रात्री उशिरा डॉक्टर शिंदे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान लवटे करत होते. मोबाईल लोकेशनद्वारे माहिती काढल्यानंतर चार आरोपींचा या लुटमारीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यातील जत तालुक्यातील लकडेवाडी येथील बिरदेव भोलानाथ लोखंडे या युवकास पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. चौघा संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान लवटे करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:19 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!