नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गप्पा मारून कोणी मोठं होत नाही सुषमा अंधारे पाचोरा सभेत शिंदे गटावर घणाघाती टीका

प्रतिनिधी-भुवनेश दुसाने

पाचोरा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना नेत्या वैशालिताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात पाचोरा येथे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन, आपला महाराष्ट्र ,महान महाराष्ट् या संदर्भात दि.२ नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी ५ वाजता सभा पार पडली. यावेळी शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्यासह सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,गणेश परदेशी,पाचोरा तालुका संपर्क प्रमुख सुनिल पाटील, युवा सेना विस्तारक शरद कोळी,जिल्हा प्रमुख डाॅ.हर्षल माने,विष्णु भंगाळे, जळगाव महापौर जयश्री महाजन,उपजिल्हा प्रमुख अॅड. अभय पाटिल,माजी जि.प.सदस्य उध्दव मराठे, दिपकसिंग राजपुत,राजेंद्र साळुंखे,नरेंद्र सुर्यवंशी, डॉ.सुरेश पाटिल, डाॅ.योगेंद्रसिंह मोरे, शेतकरी सेना प्रमुख अरूण पाटिल, तालुका प्रमुख रमेश बाफणा,शरद पाटील, शंकरशेठ मारवाडी, दत्ता जडे, धर्मेद्र चौधरी,मनोहर चौधरी, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, अजय पाटिल आदीं सह पदाधिकारी, पाचोरा भडगाव मतदार संघातिल शिवसेना, युवासेना,महिलासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन,महापुरूषांच्या प्रतिमा पुजन व पाच मशाली पेटवून सुरूवात करण्यात आली.मनोगतात युवासेना विस्तारक शरद कोळी यांनी महाराष्ट्राला धोका देणारे, शिवसेनेच्या पाठित खंजिर खुपसणार्‍यां गद्दारांना येणार्‍या निवडणुकित जनता त्यांचे राजकिय अस्तित्व व्याजासह वसुल करणार असल्याचा इशारा देउन पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटिल यांनी शिवसैनेच्या नांदाला लागु नये असा इशारा दिला.
आयोजिका *शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी* यांनी भाषणात मतदार संघाचे स्व. आमदार सुपडू आण्णा पाटील, के.एम बापू पाटील, ओंकार आप्पा वाघ आर.ओ .तात्या यांच्या राजकीय, जीवनाचे दाखले दिले. पुरोगामी महाराष्टात यापुर्वी सत्ता आणी पैशांसाठी राजकारण झाले नाही तर प्रजेच्या हिताची तळमळ होती. सध्याच्या परिस्थितित पाचोरा तालुक्यात सत्तेसाठी आणी पैशांसाठी राजकारण सुरू आहे. या पूर्वी पाचोरा मतदारसंघात राजकारणातिल कट्टर विरोधकात नैतिकता आणी गुंणवत्ता होती. भुलथापा आणी दळभर्दी राजकारण करून कोणी मोठे होत नाही असा टोला लगावला. स्वर्गिय माजी आमदारांची गौरवशाली कार्याची पुर्नरावृत्ती करण्यासाठी क्रांतीच्या लढ्यात स्वामिल व्हा. मी राजकारणात का आली यावर म्हणाल्या की, शिवसेनेच्या प्रतिकुल परिस्थितित प्रामाणिक व जमीनीवर नेतृत्व उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबिर उभे राहण्यासाठी मतदार संघातिल भावांच्या जिवावर राजकारण करणार आहे. स्व.आमदार आर.ओ.तात्या यांनी भावाला राजकारणात आणुन मोठे केले. माञ हाच भाऊ तात्यांवर आणि माझ्यावर असह्य टिका करित असल्याचे दुःख वाटते.आमदारांनी रक्षा बंधन,भाउबिजेचे फोटो टाकुन आणि आर.ओ. तात्यांचा फोटो वापरून नात्यांचा वापर करू नये.स्वतः च्या जीवावर राजकारण करावे. भविष्यातिल नगरपालिका,जि.प.,प.स. व सर्व निवडणुका पुर्ण ताकतिनिशी लढण्याचा निर्धार त् व्यक्त करित शिवसेनेला पुन्हा सोनेरी दिवस येतील असा विश्वास व्यक्त केला.
शिवेसेना उपनेत्या उध्दव ठाकरे गटाच्या फायरब्रॅंड प्रा. सुष्मा अंधारे यांनी भाषणात म्हणाल्या की, जळगाव जिल्ह्यातिल पाच बंडखोर आमदारांच्या मतदार संघात त्यांनी पक्षनेते उध्दव ठाकरे,शिवसेना आणी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत सत्तेसाठी व पैशांसाठी खंजिर खुपसुन जनतेचा विश्वासघात केला. यासाठी ही प्रबोधन याञा आहे. या मतदार संघाचे आ. किशोर पाटिल यांच्यावर घणाघाती टिका करतांना म्हणाल्या की, स्व.आर.ओ.तात्यांनी आमदारांना गरूडाची उब दिली. जनविकासासाठी पोलिस खात्याचा राजिनामा द्यायला लाउन राजकारणात आणुन मोठे केले.त्याच तात्यांचा आमदारांनी कशा प्रकारे घात केला याची उदाहरणे दिली. गतकाळात मतदारांनी उमेदवार पाहुन नव्हे तर पक्ष नेतृत्व,पक्ष आणी पक्षचिन्ह पाहुन जनतेने यांना निवडुन दिले.माञ हिच लोक आता शिवसेनेच्या मुळावर उठली आहे.पाचोरा मतदाराच्या राजकारणावर बोलल्या की, या मतदार संघात मागिल काळात उदार मतवादी आणी जनहित,वैभवशाली परंपरा देणारे नेते होते.माञ गेल्या काही वर्षात येथे ६०—४०% फाॅरमुला वापरून राजकारण होत आहे. आमदार किशोर पाटिल यांच्या भोवताली शेटजी,भटजी आणी ठेकेदारांची सेना आहे. माञ हेच लोक आमदारांचे राजकारण बुडवणार आहे. किशोरआप्पा गप्पा मारल्याने गद्दारीची ठपका पुसला जात नाही.
आमदार आघाडी सरकारच्या सत्तेत असतांना आणी गद्दारी केल्यानंतर म्हणतात की, राष्टवादी आणी काॅंग्रेस यांच्या सोबत उध्दव ठाकरे यांनी केलेली युती अनैसर्गिक होती.म्हणुन आम्ही बंडखोरी करून बाहेर पडलो.मग पाचोरा मतदार संघात राष्टवादी सोबत अनैसर्गिक युती केली.सध्यास्थितिला आमदार किशोर पाटिल यांच्याकडे काॅट्रॅक्टर सेना आहे.तसैच गद्दार फळी बाजुला झाल्यामुळे निष्ठावान शिवसैनिकांना चांगले दिवस आले त्यांचे मी आभार मानते.भाजपाच्या इशार्‍यावर काम करणारे मुख्यमंञी महाराष्टात बेरोजगारी दुर करणारे विकास प्रकल्प गुजरातला जात असतांना का बोलत नाहीत? तसेच भाजपचे कोणत्याच नेत्यांचे घोटाळे किरिट सोमय्या का काढत नाहीत?नेत्यांच्या पाठित खंजिर खुपसण्याचे काम मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी केले.नुकतेच आ. किशोर पाटिल यांनी वाढदिवसा निमित्त बेरोजगारांना हाताला काम देण्यासाठी रोजगार मेळावा घेतला माञ या मेळाव्यातुन किती हजार बेरोजगारांना नोकरी दिल्या याची यादी जाहिर करावी.तसेच आदिवासी,भिल्ल व इतर दलित समाजासाठी आमदारांनी काय विकास कामे केली ती गावे?तालूक्यातिल निपाणे येथिल दलित महिलेचे प्रेत जाळण्यासाठी विरोध करणार्‍या आरोपींना अद्याप अटक का झाली नाही?कागदोपञी पुरावे दाखवतांना म्हणाल्या की, नगरविकास मंञालयाच्या माध्यमातुन भुखंड आणी विकास आराखड्यांचे नियम आमदारांनी धाब्यावर बसुन घोटाळा केल्याचा गंभिर आरोप केला. उध्दव ठाकरे हे अडिच वर्ष हे घरात बसुन होते.त्यांनी महाराष्टाच्या विकासासाठी काहीच केले नाही असे आरोप करणार्‍या विरैधकांना उत्तर देण्यासाठी उध्दठ ठाकरे यांनी केलेल्या करोना काळात आणी अडिच वर्षात जनविकासाची कामांचीव्हिडियो सभेत दाखवण्यात आले.तसेच स्व.आर.ओ.तात्यांचा राजकिय वारसा आणी मतदार संघ सुजलाम सुपलाम करण्यासाठी त्यांची कन्या वैशालिताई सुर्यवंशी या राजकारणात आल्या आहेत.या भावी आमदार असल्याचे घोषित करून त्यांच्यासाठी मतदार संघात गद्दार आमदारांचा समाचार घेण्यासाठी पुन्हा येण्याचा ईशारा देउन गेल्या.कार्यक्रमाचे आभार अॅड.अभय पाटिल यांनी मानले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:14 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 33 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!