DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संजय गुरव
शहादा:- मणिपूर घटनेचा निषेधार्थ विविध आदिवासी संघटनांचा आवाहनाला प्रतिसाद देत आज शहादा शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.यावेळी सकाळ पासूनच व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद केली होती.
दरम्यान विविध आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बिरसा मुंडा जिंदाबाद आदिवासी एकता जिंदाबाद,एकलव्य संघटना जिंदाबाद आदी घोषणा देत घटनेचा निषेध करून शांततेच्या मार्गाने मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढण्यात आला.यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.मोर्चा दरम्यान शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना व स्मारकांना अभिवादन करण्यात आले.दरम्यान ग्रामीण भागात एका एस.टी.बसच्या काचा फोडण्या व्यतिरिक्त इतर कोणताही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत बंद पाळण्यात आला.
मणिपूर राज्यात घडलेल्या तसेच इतर राज्यातही आदिवासींवर हल्ले अत्याचाराच्या घटना घडत आहे या घटनांच्या निषेधार्थ विविध आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या बंदला विविध राजकीय पक्ष,संघटनांनी पाठिंबा दिला होता.बंदमुळे शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.यावेळी विविध आदिवासी संघटनांतर्फे बाबा साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून मणिपुर येथील घटनेच्या निषेध करत मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रांताधिकार्यांना निवेदन देऊन घटनेतील दोषींना कडक शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली.दरम्यान सकाळी शहादा पुनर्वसन ही बस आगारातून मार्गस्थ झाल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी ग्रामीण भागात बसचा काचा फोडल्याने एस.टी.च्या फेऱ्या काही काळ बंद करण्यात आल्या होत्या. दुपारच्या सत्रात दोन वाजेदरम्यान पूर्ववत फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या परंतु या काळात प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.बस फेऱ्या बंद असल्याने शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम झाला.
यावेळी जेष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. सुरेश नाईक, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, भाजपचा आदिवासी आघाडीचे लक्ष्मीकांत वसावे, इंजि. झेलसिंग पावरा, सुरेश मोरे, दंगल सोनवणे, दीपक ठाकरे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, राष्ट्रवादीचे सुरेंद्र कुवर, चंद्रसिंग बर्डे, अनिल कुवर, सुभाष नाईक, एकनाथ नाईक, धर्मा नाईक, परेश पवार, सूरज ठाकरे, गोपाळ गांगुर्डे, इरफान पठाण, रंजना कान्होरे, भिकू पावरा, उर्मिला पावरा, संतोष निमगुळे, राजा वाघ,bडॉ.अजहर पठाण, डॉ. सुलतान मेमन, छोटू शेख, रफिक मेमन, फारूक बागवान, कमर अली, नासीर पठाण आदीसह विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी साहित्यिक वाहरू सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, नामदेव पटले, डॉक्टर सुरेश नाईक यांनी मनोगत व्यक्त करून घटनेच्या निषेध करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.