फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन करण्यात आला गौरव.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री : सारंगखेडा (जि. नंदुरबार) येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टिव्हलमध्ये हॉर्स रायडिंग स्पर्धेत साक्री येथील रहिवासी तथा शिरपूर येथील मुकेश आर. पटेल पब्लिक स्कूल या शाळेचा विद्यार्थी तनिष्क नितीन साळुंके
याने प्रथम क्रमांक पटकावला. तनिष्कला फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तनिष्क शेवाळी (दा) माजी सरपंच तथा साक्री पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन साळुंके व प्राथमिक शिक्षिका क्रांती साळुंके यांचा मुलगा आहे.तनिष्क ने मिळवलेल्या यशाबद्दल साक्री तालुक्यातील सर्व क्षेत्रातील नागरिकांकडून कौतुक करीत अभिनंदन केले जात आहे.