देउर जि.प.मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर इंदासराव सेवानिवृत्त
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- रविंद्र गवळे
नंदुरबार:- गुरुजींच्या निवृत्तीच्या सन्मान कार्यक्रमाच्या त्या व्यासपीठावर आई आजी काका कुटुंबातील ज्येष्ठांना बसवून निवृत्त होणाऱ्या गुरुजींच्या अगोदर त्यांच्या सन्मान होतो ही बाब अभिमानास्पद आहे व त्यांच्या कार्याची दखल घेऊन विद्यार्थ्यांसह गावकरी गुरुजींचे कौतुक करतात हीच खरी कामाची खरी पावती होय असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंहरावल यांनी केले.
शहादा तालुक्यातील वडाळी येथील फुले सभागृहात देऊर चे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर इंदासराव यांचे शिक्षण विभाग पंचायत समिती शहादा अंतर्गत बांमखेडा जयनगर केंद्रातील प्राथमिक ,माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल याप्रसंगी पंचायत समिती सभापती वीरसिंग ठाकरे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे गटशिक्षणाधिकारी डॉ योगेश सावळे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक सल्लागार सुरेश भावसार पंचायत समितीच्या सदस्या चंदन बाई पानपाटील शिक्षण विस्तार अधिकारी मनताबेन पटेल सुनील तावडे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मोहन बिसनारिया भगवान पाटील मागासवर्गीय शिक्षण संघटनेचे अध्यक्ष दादाभाई पिंपळे सामाजिक कार्यकर्ता सुलभा महिदे वडाळीचे माजी सरपंच दीपक पाटील पोलीस पाटील गजेंद्र गोसावी पंचायत समितीचे माजी सदस्य गिरीशजी जगताप महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक बच्छाव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे म्हणाले की नोकरी करताना गुरुजींनी माझे जेवढे वय तेवढे वर्ष त्यांनी नोकरी करून निवृत्त झाले मात्र ज्या वेळेला इंटरनेट अत्याधुनिक सोईसुविधा नव्हंत्या अशा त्याकाळात दुर्गम भागासह विविध ठिकाणी नोकरी करणे म्हणजे तारेवरची कसरत होती अशा काळात गुरुजींनी पस्तीस वर्ष नोकरी आजचे सेवानिवृत्त होत आहे त्या काळात जे त्यांनी विद्यार्थी घडवले ते व्यवसाय नोकरी करत त्यांच्या मनोगत व्यक्त करून त्यांचे गुण गौरव करत आहेत हीच त्यांच्या कामाची पावती होय यावेळी दादाभाई पिंपळे मोहन बिसरानिया गटशिक्षणाधिकारी डॉ योगेश सावळे तुषार गोसावी सुरेश भावसार आदींनी मनोगत व्यक्त केले आपल्या सेवानिवृत्ती सन्मानाला उत्तर देताना मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इंदासराव म्हणाले की माझ्या आयुष्यात एवढा मोठा मित्रपरिवार यांचा गोतावळा आहे व त्यांनी नोकररी करीत असताना मला भरभरून प्रेम दिले हे मी आयुष्यभर ऋणी राहील उर्वरित जीवन सामाजिक कार्यात जोपासले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन मोहन बीसनारिया यांनी केले आभार प्राथ. शिक्षिका सुवर्णा इंदासराव यांनी मानले केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथ .शिक्षक सचिन पत्की व माध्यमिक शिक्षक आय डी माळी यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला वडाळी जयनगर बामखेडा परिसरातील माध्यशिक्षक प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण विभाग संघटनेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले
———गुरुजींचा विशेष सत्कार———
मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इंदासराव पत्नी सुवर्णा इंदासराव यांनी व्यासपीठावर त्यांच्या आई आजी मावशी काका यांना विशेष प्राधान्य देऊन स्थानापन्न करून त्यांच्याकडून एक आगळावेगळा सत्कार झाल्याने उपस्थित असलेल्या मान्यवरांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.