DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री : भारतीय जैन संघटनेतर्फे साक्री शहरातील अरिहंत जैन भवन येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त कर्तृत्वान डॉक्टर्स,पत्रकार आणि युवांचा सन्मान आणि बी.जे.एस युवक आणि महिलांचा सन्मान प्रमुख अतिथीद्वारे करण्यात आला .
या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी बी.जे. एस चे खान्देश विभाग अध्यक्ष श्री चंद्रकांतजी डागा सर होते तर प्रास्ताविक खान्देश च्या विभागीय उपाध्यक्ष सौ. जोशीलाताई पगारिया यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान महावीर स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन वंदन करून कऱण्यात आली.
महिलामंडळ अध्यक्षा सौ. सुरेखाताई कर्नावट यांच्या टीमद्वारे मंगलाचरण ने कार्यक्रमाची पुढे सुरुवात झाली. सौ. जोशीला पगारिया यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्र्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन त्यांच्या अंगी असलेले गुण युवकांनी आत्मसात करुण देशाचे भविष्य घडवावे असे प्रतिपादन केले.
बी जे एस खान्देश विभाग अध्यक्ष चंद्रकांत भाऊ डागा यांनी आपल्या भाषणात भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शांतीलालजी मुथा यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल माहिती दिली व तसेच बी जे एस च्या कार्याचे कौतुक केले, शंभर जिल्हे गाव जलमुक्त अभियान, परिचय संमेलन, बुद्धिमापन चाचणी, अल्पसंख्याक कार्यशाळा, शिबीरे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, वृक्षारोपण, युवकांच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदतीचा हात, बिझनेस मॅनेजमेंट, शिष्यवृत्ती अश्या अनेक प्रकारचे कार्य भारत देशातील बारा राज्यात सुरु झाले असून अजून काही राज्यात कार्यकर्ता मार्फत कामे सुरु आहेत.
डॉ. आशिष पगारिया यांनी साक्री शहराच्या सर्व नवनिर्वाचित युवकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुमित भाऊ मुनोत यांनी सर्व युवकांना प्रतिज्ञा पत्र शपथ देऊन शुभेच्छा दिल्या. खान्देश विभाग अध्यक्ष चंद्रकांतभाऊ डागा, डॉ. आशिषजी भरतचंदजी पगारिया, डॉ. निलेशकुमार नितीनजी कर्नावट, दैनिक दिव्यमराठी चे प्रतिनिधी कल्पेश मिस्तरी, आय आय टी विद्यार्थी विमलकुमार प्रमोदजी टाटीया या सर्व मान्यवरांचा सन्मान भारतीय जैन संघटना साक्री अध्यक्ष विजयकुमार राजेंद्रजी टाटीया, उपाध्यक्ष प्रतीककुमार चंद्रकांतजी टाटीया, सचिव भूषणकुमार अशोकजी कोचर यांच्यासह सहकार्यामार्फत करण्यात आले. शेवटी आभार बीजेएस खान्देश विभागीय सदस्य अजितभाऊ टाटीया आणि पियुष कर्नावट यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती खान्देश सदस्य प्रकाशचंदजी खिच्चा,
खान्देश कोषाध्यक्ष सचिन कोठारी, जिल्हा कार्यकारणी उपाध्यक्ष निखिल टाटीया
स्थानकवासी संघ अध्यक्ष राजेंद्र जी टाटीया, तेरापंथ सभा अध्यक्ष अनिलकुमार कांकरिया, नगरसेविका सौ. जयश्रीताई पगारिया, महिला उपाध्यक्ष सौ. कल्पनाबाई कांकरिया सचिव सौ. मनालीताई पगारिया, सचिव सौ. सोनम ताई टाटीया, सौ. शालू ताई कांकरिया, केतनकुमार संचेती, चेतनकुमार टाटीया, आकाशकुमार टाटीया,सनीकुमार कोचर,धीरजकुमार टाटीया, यश कुमार टाटीया, चंद्रेश कुमार लुंकडं, चिन्मय कुमार पगारिया सहित समस्त सकल जैन समाज मोठया संख्येने उपस्थित होता.